'- जगविख्यात विश्वरचनाशास्त्रज्ञ आणि द ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या लोकप्रिय पुस्तकाचे बेस्टसेलिंग लेखक स्टीफन हॉकिंग यांचं नवं आणि अखेरचं पुस्तक. हॉकिंग यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर प्रकाशित झालेल्या या पुस्तकात, विश्वातल्या मूलभत प्रश्नांबाबतचे त्यांचे विचार आहेत - विश्वाची उत्पत्ती कशी झाली? पृथ्वीवर मानवजात तगून राहील का? आपल्या सूर्यमालेबाहेर बुद्धिमान जीवसृष्टी आहे का? कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आपल्यावर नियंत्रण ठेवेल का? मानवजातीसमोर असलेली आव्हानं आणि पृथ्वी कोणत्या दिशेने विस्तारत आहे, याविषयी लेखकानं प्रस्तुत पुस्तकात आपले विचार मांडले आहेत.
(Tags : Brief Answers to the Big Questions Stephen Hawking Audiobook, Stephen Hawking Audio CD )